वरदविनायक मंदिरात भक्तांची मांदियाळी

| खोपोली | प्रतिनिधी |

माघी गणेशोत्सव महड येथील वरदविनायक मंदिरात मंगळवारी (दि.13) मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी गणरायाच्या दर्शनासाठी सकाळपासून भक्तांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. दरम्यान, श्रींच्या महापूजेचा मान कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांना मिळाला होता. मंदिराच्या गाभाऱ्याला फुलांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, राजमुद्रा साकारली होती. नवस फेडण्यासाठी शेकङो जोडप्यांनी गर्दी केली होती. हभप चारूदत्त आफळे बुवांच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली.

आलेल्या गणेश भक्तांची दर्शनासाठी गैरसोय होवू नये यासाठी चोख व्यवस्था तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाहन व्यवस्था तसेच महाप्रसादाची सोय वरदविनायक देवस्थान संस्थानाकडून करण्यात आली असल्याची माहिती श्री वरदविनायक देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी दिली.

Exit mobile version