मांडला ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची सभा

। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा मांडला येथे संघटनेचे अध्यक्ष संतोष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष मोरे, उपाध्यक्ष प्रकाश मुंबईकर, नवनिर्वाचित सचिव हरीष सूरती, नवनिर्वाचित खजिनदार सचिन बिरवाडकर, सलागार तथा माजी तालुका अध्यक्ष सूर्यकांत जंगम, ज्येष्ठ सभासद ज्युलियस रुझारियो, कार्यकारिणी सदस्य व सर्व सभासद यावेळी उपस्थित होते.

सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी सचिव हरीष सुरती यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. शासन स्तरावर मंजूर सुधारित किमान वेतनाबाबत अध्यक्ष संतोष मोरे यांनी माहिती दिली व शासनाने सुधारित किमान वेतन लागू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच तालुक्यात सर्व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सुधारित किमान वेतन, राहाणीमान भत्ता लागू झालाच पाहिजे. याबाबत मरुड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना एक निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. अनेक कर्मचार्‍यांचे भविष्य निर्वाह निधी कित्येक वर्षे त्यांच्या खात्यात जमा केलेले नाही. तरी सदरची रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी. याबाबतसुद्धा एक पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून संघटनेतील सागर मालजी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर हरीष सुरती यांची, तर खजिनदार व नियोजक सल्लागार म्हणून सचिन बिरवाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व उपस्थितांनी या निवडीचे स्वागत करुन नवनिर्वाचितांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीष सुरती यांनी, तर आभार संतोष मोरे यांनी मानले.

Exit mobile version