। सोगाव । वार्ताहर ।
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यावेळी अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघातील मांडवा सागरी पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.19) सायंकाळी चोंढी व झिराड येथे संचलन केले.
हे संचलन चोंढी येथील स.म. वडके शाळा, चोंढी नाका, अपना बाजार, रेल्वे फाटक, मुख्य बाजारपेठ, चोंढी पूल असे काढण्यात आले. तसेच, झिराड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, वैभव हॉटेल, मुख्य बाजारपेठ, पाटील पोल्ट्री, मांडवा सागरी पोलीस ठाणे असे पदपथ संचलन करण्यात आले. यावेळी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षकभोई, दुय्यम अधिकारी पोलीस उपनिरीक्षक खोत, पोलीस उपनिरीक्षक वाणी व 10 अंमलदार, आरसीपी प्लाटून वडखळचे 32 अंमलदार, सीआयएसएफचे 46 जवान या संचलनात सहभागी झाले होते.