तेजस्विनी फाऊंडेशनतर्फे मंगळागौर

| भाकरवड | वार्ताहर |

तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन कुसुंबळे अलिबाग आयोजित मंगळागौर समूह नृत्य स्पर्धा 2023 चे आयोजन कातळपाडा येथील कालकाय देवी मंदिरात करण्यात आले होते. या कार्यक्रमात वाघ्रण येथील साईकृपा महिला मंडळ, प्रेरणा महिला समूह कुसुंबळे आदिवासीवाडी, आशीर्वाद स्वयंसहाय्यता महिला समूह कातळपाडा, अंगणवाडी महिला मंडळ कूर्डूस यांनी मंगळागौर नृत्य सादर केले. ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा कार्यक्रमाचा मूळ उद्देश असल्याचे मत यावेळी संस्थापिका जिविता पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी ॲड. डॉ. निहा राऊत, स्पर्धा प्रमुख धीरज पाटील, भाग्यश्री तांडेल, राखी पाटील, ॲड. विकास पाटील, प्रतिभा वाघ, देवेंद्र केळूस्कर, गुफरान शेख, प्रशांत पाटील, प्रणाली पाटील, साधना पाटील, राजेंद्र पाटील, विकास वाघ, अनिल पाटील, राजेश पाटील, केशव पाटील, रुक्मिणी पाटील, चांगुणा पाटील, अरविंद पाटील, प्रसाद पाटील, संजोग पाटील, ललिता पाटील, धन्यता निळकर, यशोदा पाटील इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिविता पाटील तर आभार प्रदर्शन धीरज पाटील यांनी केले.

Exit mobile version