एका महिलेसह ६ आरोपी अटकेत
। माणगाव । वार्ताहर ।
माणगांव तालुक्यातील कडापूर गावच्या हद्दीत व्हेल माशाची ५ किलो ८०० ग्राम वजनाची उलटी सुमारे ५ कोटी ८० लाख किमतीची उलटी जप्त करण्यात अली आहे. माणगांव पोलिसांनी पाच पुरुष व एका महिला आरोपीला सापळा रचून पकडले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २५ जून रोजी माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रायगड पाचाड रोडवर कडापूर गावच्या हद्दीत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार आहे. त्यानंतर माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे माणगाव उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी स.पो. नि. नितीन मोहिते, स. पो. नि लहांगे, पो.स.ई गायकवाड, पो. स. ई. आघाव, सहा फौजदार जितेंद्र वाटवे, पोहवा प्रशांत पाटील, पोहवा दर्शन दोड़कुळकर, पो.हवा रावसाहेब कोळेकर, मपोना निवेदिता धनावडे, मपोना कोंजे, मपोना कुंजन जाधव, पोना मिलिंद खिरीट, पोशि रामनाथ डोईफोडे, पोशि श्याम शिंदे, पोशि शिवाजी मिसाळ, पोशि गिते, पोशि गोविंद तलवारे, पोशि प्रवीण माटे, पोशि पोंधे, वन विभागाचे वनरक्षक अक्षय मोरे यांची टीम बनवून सापळा रचला.
दुपारी साडेतीनच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या कारजवळ असलेल्या एका झाडा जवळ एक इसम अर्धवट रेनकोट घातलेल्या स्थितीत संशयास्पद स्थितीत त्याच्याकडे असलेली प्लास्टिकची गोणी लपवताना आढळुन आला. त्याला माणगाव पोलीस टीम मध्ये असलेले पोलीस नाईक मिलिंद खिरीट यांनी जागीच पकडून ह्या गोणीत काय आहे? अशी विचारणा केली तर त्यामध्ये व्हेल माशाच्या उलटी चा एक मोठा तुकडा आढळून आला. त्या इसमास पोलिसानी नाव विचारले असता त्याने नाव दिनेश उमाजी भोनकर राहणार सुरव तर्फे तळे तालुका माणगाव व व्यवसाय चालक अशी माहिती दिली. तसेच त्याने तो व्हेल माश्याच्या उलटीचा तुकडा विक्री साठी दिनेश शेडगे रा. रायगड रोड महाड यांच्याकडुन आणला असल्याचे सांगितलेव सोबतचे साथीदार कोण आहेत? विचारणा केल्यानंतर त्याने त्याच्यासोबत गाडीमध्ये वैभव बाबुराव कदम, योगिता वैभव कदम दोघेही राहणार नवीन पनवेल, दत्तात्रय मोहन शेट्ये रा गिरगाव मुंबई, सुरेश पंढरीनाथ नलगे रा.ठाणे पश्चिम, सूर्यकांत वसंत पवार रा.घणसोली नवी मुंबई अशी नावे समजली आहेत.
या तस्करीमध्ये हुंडाई आय टेन कार क्रमांक एम एच ०२ सी एच ९७१७ ही वापरण्यात आली. गाडीत बसलेल्या सर्व व्यक्तींना पोलिसानी विचारणा केली असता, ही व्हेल माशाची उलटी विक्रीकरिता आणली असल्याचे पंचांसमक्ष कबूल केले व ज्याच्याकडून उलटी आणली आहे तो कोठे आहे अशी विचारणा केली असता तो पाठीमागून येत आहे असे सांगितले. दिनेश भोनकर याच्या ताब्यात मिळालेल्या गोणीमध्ये आढळुन आलेली व्हेल माशाची उलटी हा चॉकलेटी रंगाचा एक मोठा तुकडा असून वजन काट्यावर त्याचे वजन केले असता ५ किलो ८०० ग्रॅम इतके आहे .पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल माणगाव पोलिसांनी जप्त करून, एका महिलेसह एकूण ६ आरोपींना माणगाव पोलिसांनी अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे हे करीत आहेत.