। मुंबई । प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना अॅक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून येतंय. आज मुंबईत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचा शिवसेना मेळावा झाला आहे. या मेळाव्यातून संघटनात्मक पकड मजबूत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आदित्य ठाकरेंचा कलिना- कुर्ला भागात मेळावा होता. या शिवाय मुंबईत शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शनही केलं आहे. सामनाचं कार्यालय ते शिवसेना भवन अशी बाईक रॅली काढत शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केल.
शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये कोणता झेंडा हाती घेऊ असा संभ्रम पसरला आहे. त्यामुळे शिवसैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्यातला संभ्रम दूर करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आजच्या मेळाव्यात मार्गदर्शन केल आहेत.
आदित्य ठाकरे यांचा इशारा
विधानभवनाकडे जाणारे रस्ते वरळी, वांद्रे, परळ, भायखळ्यातून जातात, हे लक्षात ठेवा अशा शब्दात शिवसेनेचे युवानेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना इशारा दिलाय. मुंबई एअरपोर्टवर उतराल तेव्हा लक्षात ठेवा, मग केंद्राने भले आर्मी लावावी किंवा CRPF असंही आदित्य ठाकरे यांनी म्हंटलंय. आपल्या वक्तव्यातून आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना थेट आव्हानच दिलंय.