गणेशोत्सवासाठी माणगाव आगार सज्ज

मुंबईसह ग्रामीण भागात धावणार लालपरी

| माणगाव | प्रतिनिधी |

कोकणातील गणेशभक्त मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे, पुणे तसेच सुरत आदी भागात मोठ्या प्रमाणात आहे. तो आपल्या लाडक्या दैवताच्या दर्शनाला आतुरलेला असून, या गणेशभक्तांच्या प्रवासात कोणतेही विघ्न येऊ नये तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित व वेळेत व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या माणगाव बस आगाराने विशेष काळजी घेत नेटके नियोजन केले आहे. त्यासाठी गणेशभक्तांच्या सेवेसाठी माणगाव आगार आता सज्ज झाले आहे.

यावर्षीही माणगाव बस आगाराने प्रवाशांची विशेष काळजी घेतली असून, मुंबईसह ग्रामीण भागातील प्रवासी नागरिकांच्या सेवेसाठी लालपरी सजली आहे. त्यामुळे मुंबई सह ग्रामीण भागात ही लाल परीच्या विशेष फेऱ्या होणार असून आतापर्यत 27 बस गाड्यांचे आगाऊ आरक्षण फुल्ल झाले आहे. माणगाव बस आगारात 36 बस गाड्या आहेत. यंदाचे वर्षी मुंबईतून प्रवाशांना सोडण्यासाठी जादा विशेष गाड्या सोडून प्रवाशांची सोय गणेशोत्सव काळात प्रवाशांना सोडण्यासाठी केली जाणार आहे. तर गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी मुंबईकडे प्रवाशांना सोडण्याची माणगाव बस आगारावर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सुरत, मुंबई, ठाणे, नालासोपारा, बोरिवली, कल्याण, भिवंडी, यासह अनेक भागात लाल परी प्रवाशांच्या सेवेला धावणार असून, यंदा गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाला माणगावआगार सज्ज झाले आहे.

गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी असून मुंबईतून गणेशभक्त आपल्या गावी येण्यासाठी आतुरलेला आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या माणगाव बस आगाराने गणेशोत्सवात गावी आलेल्या प्रवासी नागरिकांना परतीच्या प्रवासासाठी नियोजन केले आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचाही विचार करून लालपरीच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यामुळे यंदाचे वर्षी वरिष्ठ कार्यालयाकडून दिले गेलेले उत्पन्नाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी माणगाव आगारातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सवात माणगाव आगाराच्या बसमधून सरासरी 4268 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून गेल्या वर्षी गणेशोत्सवात 7,72,414 रु. उत्पन्न घेऊन माणगाव आगाराने विक्रम केला होता.

Exit mobile version