। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव शिवजयंती उत्सव रक्तदान शिबीर समितीतर्फे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त केईम रुग्णालय मुंबई यांच्या सौजन्याने सरलादेवी मंगल कार्यालय हॉल, माणगाव याठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात येऊन या शिबिरात तब्बल 212 अशा विक्रमी रक्त बॅगा संकलित करण्यात आल्या. या शिबिरासंदर्भातील जमा-खर्चाची बैठक शुक्रवार, दि. 3 मार्च रोजी रात्री ज्ञानदेव पवार यांच्या हॉटेल ठिकाणी उत्साहात संपन्न झाली.
यावेळी सल्लागार तरुण मराठी उद्योजक सुभाष दळवी, सहसचिव शंकर शिंदे गुरुजी, राजेंद्र खाडे, सचिन शरद देसाई, अजित शेडगे गुरुजी यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत शिबीर यशस्वी झाल्याने सर्वांचेच कौतुक केले. या बैठकीला समीतीचे अध्यक्ष सलीम शेख, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पवार, समितीचे पदाधिकारी व सभासद प्रा. हर्षल जोशी, शंकर शिंदे गुरुजी, अरुण मजिद हाजिते, अजेश नाडकर, सचिन शरद देसाई, दीपक दपके, राजेंद्र खाडे, भालचंद्र खाडे, शर्मिला सत्वे, उमेश यादव, राहुल दसवते, संतोष मांजरे, समीर सकपाळ, प्रसाद धारिया, सिद्धांत देसाई, प्रदीप देवरे, राजू सुतार,भावेश भानुशाली, निलेश मेथा आदी उपस्थित होते. शेवटी प्रभाकर मसुरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता केली.