माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे पुरस्कार वितरण

| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुका पत्रकार संघाच्या चतुर्थ वर्षातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा माणगाव कुणबी भवन येथे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते व आ. भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास सभापती अलका जाधव, संजयआप्पा ढवळे, नगरसेवक आनंदशेठ यादव, पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख, उद्योजक नावाजभाई मुलाणी, सुभाष केकाणे, दिलदार पुरकर, बाबूशेठ खानविलकर, संगीता बक्कम, शर्मिला सत्वे, अलिबाग पं.स.सदस्या रचना थोरे, नगरसेविका ममता थोरे, माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, उद्योजक विजयशेठ मेथा, नगरसेवक दिनेश रातवडकर, नगरसेवक राजेश मेहता, उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के, माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे, प्रा.हर्षल जोशी, प्रा.सतीश बडगुजर, प्रा.नीलिमा काप, प्रा.शब्बीर हज्जू सुभाषशेठ दळवी, रामभाऊ टेंबे, कडापे सरपंच मारुती मोकाशी, संदीप खरंगटे, माजी नगरसेवक जयंत बोडेरे आदींसह नागरिक बंधू – भगिनी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे (आदर्शव्रत प्रशासकीय अधिकारी), शांताराम खाडे (अध्यात्मिक), चंद्रशेखर देशमुख (सहकार), महादेवराव बक्कम (समाजभूषण), अ‍ॅड.केदार गांधी(विधी), डॉ.प्रदीप इंगोले (वैद्यकीय), तळा उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे (आदर्श लोकप्रतिनिध), राजन मेथा (यशस्वी उद्योजक), नेहा दाखिनकर (आदर्श महिला सरपंच), मंगेश पोळेकर(तरुण उद्योजक), संजय गांधी(कोविड योद्धा), राजेंद्र तेटगुरे (आदर्श ग्रामसेवक), शंकर शिंदे (आदर्श शिक्षक), डॉ.आरिफ पागारकर (जेष्ठ पत्रकार), देवयानी मोरे (महिला युवा पत्रकार), किशोर मालुसरे (आदर्श तलाठी), लालासो वाघमोडे (कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस), रामदास जाधव (प्रगतशील शेतकरी) आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सूत्रसंचालन प्रा.नीलिमा काप व प्रा.शब्बीर हज्जू यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रभाकर मसुरे यांनी करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी तसेच प्रा.हर्षल जोशी,प्रा.सतीश बडगुजर व सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version