गणरायाच्या स्वागतासाठी माणगावकर झाले सज्ज!

। माणगाव । वार्ताहर ।

7 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत असून गणरायाच्या स्वागतासाठी माणगावकर सज्ज झाले असून बाजारपेठ विविध साहित्यांनी फुलली आहे. माणगाव बाजारपेठेत एचडीएफसी बँकेच्यासमोर महामार्गालगत गोविंद कॉम्प्लेक्स याठिकाणी सालाबादप्रमाणे सलग सहाव्या वर्षी निलेश नामदेव रातवडकर यांनी आपल्या सई कला केंद्रात माणगाव येथे पेणच्या अर्धा फुटपासून ते चार फूट उंचीपर्यंतच्या गणरायाच्या सुबक मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. याठिकाणी गणरायासाठी लागणार्‍या आकर्षक फेटा, धोतर व डायमंड वर्क तयार करून मिळतील तसेच दहीहंडीसाठी लागणारे सुबक आकर्षक मडकी मिळतील अशी माहिती निलेश रातवडकर व पायल रातवडकर यांनी दिली. मुंबई, पुणे येथून मोठ्याप्रमाणात चाकरमानी आपल्या गावी कोकणात हा उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात. माणगावची बाजारपेठ गणेश सजावटीसाठी आवश्यक असणार्‍या विविध साहित्यांनी फुलली आहे.

Exit mobile version