पोलादपूर | शैलेश पालकर |
नगरपंचायत पोलादपूरच्या विकासाची पहिली संधी शिवसेनेच्या निर्विवाद नगरसेवक संख्येला मिळाल्यानंतर शिवसेनेच्या आश्वासनांचा वचननामा आणि कार्यपूर्तीची यादी जाहिरनाम्यात देण्यात आली आहे. काँग्रेसकडून वचननामा असा उल्लेख करून काही आश्वासनांची यादी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचा जाहिरनामा सर्व जाहिरनाम्यांमध्ये सरस असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वचकनामादेखील वाचनीय झाला आहे.
शिवसेनेच्या जाहिरनाम्यात चुका दिसून येत आहेत. निवडणुक जाहिरनाम्याचा प्रभाव साधारणपणे प्रभागामधील मतांची संख्या वाढण्यावर दिसून येत असल्याने मागील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर यावेळी कोणत्या पक्षाला किती मते मिळतील, हे निवडणूक जाहिरनाम्यामुळे ठरण्याचा प्रकार पहिल्या टप्प्यामध्ये सर्वच पक्षांचे निवडणूक जाहिरनामे मतदारांकडून दूर्लक्षित राहिल्याने दुसर्या टप्प्यात तरी मतदार या जाहिरनाम्यांचे अवलोकन करू शकतील काय, असा सवाल निर्माण झाला आहे.
1)शिवसेना जाहीरनामा
नवीन पाणीपुरवठा व फिल्टरेशन प्लांट, नगरपंचायत भवन, कचरा संकलन व विलगीकरण, पंपघर व नवीन मुख्यवाहिनी तसेच नवीन विस्तारवाहिनीमधून काही प्रभागांमध्ये पाणीपुरवठा सस्वागत कमानी, नदीलगतच्या लोकवस्तीसाठी सोलर पथदिवे, ओपन योगा जीम सेंटर, वाहून गेलेली जॅकवेल तात्काळ बांधून नळयोजना बसविणार
2) काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी वचननामा
सुसज्ज प्रशासकीय इमारत, शिवाजी नगर सैनिक नगर गावठाण प्लॉटचे प्रॉपर्टी कार्ड ,नागरिकांचा विमा, खुली व्यायामशाळा, अग्निशमनदल, नाटयगृह, सुलभ शौचालय, सांडपाणी व घनकचरा नियोजनाची चर्चा करण्यात आली आहे.
3) भाजप जाहीरनामा
विकास आराखडा ,बाजिरे धरणातून पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांच्या इमारती, कचरामुक्त शहरासाठी अत्याधुनिक यंत्रणा, नवीन घरबांधणी आणि अनधिकृत बांधकामांवर आळा बसविणार, मोबाईल जनरेटरद्वारे पाणीपुरवठा, प्रत्येक प्रभागामध्ये गरजेप्रमाणे सौरऊर्जा दिवे आणि हायमास्ट दिवे,
4) मनसेचा वचकनामा
60 दिवसांतून प्रभाग सभा, हाकेच्या अंतरावर रास्तभाव धान्य दुकान, सौरऊर्जेवरील पथदिवे, प्रभाग 17 मधील स्मशानभूमी नूतनीकरण, जोगेश्वरी गाडीतळ येथे बसथांबा, कचरामुक्त नदीपात्र, गटारे व रस्ते दर्जेदार व मजबुत, प्रभागाच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमानी, बालउद्यान व क्रीडांगण, मासेविक्रीची बाजारपेठ आणि सीसीटिव्ही यंत्रणा