| कर्जत | वार्ताहर |
कर्जत तालुका विद्या प्रसारक मंडळाचे स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय पांडुरंग डोंबे विद्या निकेतन विद्यालयाच्या वतीने मनिनाद वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी अभिनेत्री उज्वला अत्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष डॉ. नितीन आरेकर, शालेय समिती अध्यक्ष माधव भडसावळे, सदस्या रोहिणी जोशी, स्नेहसंमेलन प्रमुख शिल्पा गायकवाड, विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार भोईर आदी उपस्थित होते. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीरा कडू यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माया म्हसे यांनी अहवाल सादर केला.
याप्रसंगी भडसावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्राथमिक विभागाच्या शिक्षिका स्नेहल मोरे याना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. आरेकर यांनी, मविद्यार्थ्याची ओळख पालकावरून होण्यापेक्षा पालकाची ओळख आपल्या पाल्यामुळे व्हावी.फ असे सूचित केले. याप्रसंगी याप्रसंगी संगीता किरंगे, राजू शिंदे, विनायक अहिरे, अलका गुरव, किशोर दिघे, रेश्मा निरगुडा, पिराजी पालवे, वैजू शेळके, योगेश लाड, अनंत देवळे आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.