मणिपूर पुन्हा पेटले

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

एकीकडे, मणिपूरच्या जिरिबाममध्ये शांतता राखण्यासाठी मेतेई आणि हमार समुदायांमध्ये एक करार झाला होता. पण, करारानंतर 24 तासांत जिरीबाममध्ये हिंसाचार उसळला आहे. येथे मेईतेई कॉलनीत गोळ्या झाडण्यात आल्या असून, लालपाणी गावात एका घराला आग लावण्यात आली.

खरं तर, मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मेईतेई आणि हमार समुदायांच्या प्रतिनिधींनी एकत्र काम करण्याचे मान्य केले होते. गुरुवारी आसाममधील कछार येथील सीआरपीएफ सुविधा केंद्रात झालेल्या बैठकीत समोरासमोर बसून दोन्ही पक्षांमध्ये एक करार झाला होता. या करारात दोन्ही बाजूची परिस्थिती सामान्य करण्यासाठी, जाळपोळ कमी करण्यासाठी, गोळीबाराच्या घटना थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, असा निर्णय घेण्यात आला. या करारानंतर 24 तासांच्या आत जिरीबामच्या लालपाणी गावात हिंसाचार झाला. शुक्रवारी रात्री सशस्त्र लोकांनी गावातील एका घराला आग लावली. गावाला लक्ष्य करत गोळ्यांच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दल पाठवण्यात आले आहेत.

Exit mobile version