| मुंबई | प्रतिनिधी |
“माझ्याकडे पुरावे आहेत, मी पुराव्याशिवाय बोलत नाही,” असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातून केलेल्या आरोपावर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. “मी कसली टीका टिपणी केली नाही, शिंदे साहेबांनी काय असेल ते सत्य सांगावं. भाजपकडून माझ्या नावाने त्यांनी पैसे घेतले आहेत का? घेतले असतील तर मला दिले आहेत का? त्यांनी हा किंवा नाही काय ते सांगावं, नाहीतर मी पुरावा द्यायला तयार आहे,” असे म्हणत जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा 500 कोटी रुपयांच्या देवाण-घेवाणीबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत 500 कोटी रुपयांची देवाण घेवाण झाल्याचा आरोप केला. एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही दिल्लीत भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल खोट सांगितले. कारण, मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 500 कोटी पोहोचले आहेत, असे तुम्ही भाजपच्या नेत्यांना बोलले का? असा सवाल मनोज जरांगे यांनी मेळाव्यातून उपस्थित केला. तसेच, एकनाथ शिंदे यांनी आजच्या दसऱ्या मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत शिंदेंनी उत्तर द्यावे, असेही त्यांनी म्हटले.
मनोज जरांगेंकडून शिंदेंचा समाचार
