मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन

। जालना । प्रतिनिधी ।

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बुधवारी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. घनसावंगी मतदारसंघात गोरी गंधारी गावात मनोज जरांगे यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केले.

मी मैदानात नाही. जनतेच्या हातात आहे. जनतेने अन्याय आणि अत्याचार विसरू नये. अंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. अंतरवाली सराटीत राज्यातील मराठा बांधव सामूहिक उपोषण करणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषणाची तारीख ठरवू, सरकार कोणतही येऊ द्या, असंही जरांगे यावेळी म्हणाले.

कालिचरण महाराजांवर टीकास्त्र
मनोज जरांगे पाटील हिंदुत्व तोडणारा राक्षस, अशा शब्दात स्वयंघोषित कालीचरण महाराज यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेलाही मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तो शंभर टक्के राजकीय दलाल आहे. परत बोलला याचा अर्थ तो राजकीय नेत्यांचे पाय चाटतो. त्याला हिंदू धर्माशी काही घेणं देणं नाही. याला मराठ्यांचा प्रचंड तिरस्कार आहे. वढ्या खोड्याला जन्मलेली पैदास आहे ही, अशा शब्दात मनोज जरांगेंनी टीका केली आहे.
Exit mobile version