आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेचे मनप्रीतकडे नेतृत्व

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पुढील महिन्यात ढाका येथे होणार्‍या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या 20 सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे.
ढाका येथे 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या या स्पर्धेसाठी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला विश्रांती देण्यात आली असून, क्रिशन बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यांच्याकडे गोलरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारताची पहिली लढत कोरियाशी असून, जपान, मलेशिया, पाकिस्तान आणि यजमान बांगलादेश यांचा या स्पर्धेत समावेश आहे. भारतीय संघ क्रिशन बहादूर पाठक, सूरज करकेरा, हरमनप्रीत सिंग, र्गुंरदर सिंग, जर्मनप्रीत सिंग, दिपसन तिर्की, वरुण कुमार, निलम संजीप झेस, मनदीप मोर, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, जसकरण सिंग, सुमित, राजकुमार पाल, आकाशदीप सिंग, समशेर सिंग, ललित कुमार उपाध्याय, दिलप्रीत सिंग, गुरसाहिबजीत सिंग, शिलानंद लाक्रा असणार आहेत.

Exit mobile version