माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरेंचे खेळाडूंना मार्गदर्शन
| पनवेल | प्रतिनिधी |
नवी पनवेल येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या पहिल्या ‘रामशेठ ठाकूर कप’ अंडर16 क्रिकेट स्पर्धेत मनत्रा क्रिकेट क्लबने उत्कृष्ट कामगिरी करत एमसीसी (ठाणे) संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करताना माजी भारत कर्णधार दिलीप वेंगसरकर म्हणाले, “Learn to play long innings. Discipline, Dedication & Determination ही तीन गुणवैशिष्ट्ये तुम्हाला खेळात अधिक उंचीवर घेऊन जातील.” वेंगसरकर यांनी प्रशिक्षक अमित जाधव, किरण ठाकूर, पंडलीक पोटेकर, संदीप पवार आणि कृष्णा बालू यांच्या काटेकोर नियोजनामुळे स्पर्धा अत्यंत सुरळीत पार पडल्याचे सांगितले. तसेच उत्कृष्ट विकेट्स तयार केल्याबद्दल ग्राउंड्समनचेही त्यांनी विशेष कौतुक केले. स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग घेतला. पारितोषिकांचे वितरण स्थानिक उद्योजक व क्रिकेटप्रेमी राजू गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले.







