भाईंमुळे अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली: मंदार वर्तक

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

“सहकार क्षेत्रात जयंत पाटील यांचे योगदान केवळ प्रशासकीय नाही, तर ते माणसे घडविणारे नेतृत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मला आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना झाला. त्यांच्या विश्वासामुळे अनेक सामान्य कुटुंबांना उभारी मिळाली, अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला आणि सहकार चळवळीला नवी ऊर्जा मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिसस्पर्श ज्याला लाभला, त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आज जी नवी उंची प्राप्त झाली आहे, त्यामागे त्यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व आणि माणसांवर ठेवलेला विश्वास आहे. हजारो कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे आणि संकटात आधार देणारे नेतृत्व म्हणून जयंत पाटील यांचे नाव कायम आदराने घेतले जाईल,” असे गौरवोद्गार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी काढले.

Exit mobile version