अ 3 सोगांव संघ विजेता
| सोगांव | वार्ताहर |
सानवी स्पोर्ट्स चोरोंडे व जय हनुमान क्रीडा मंडळ, चोरोंडे आयोजित मापगांव पंचायत प्रिमियर लीग 2024 चषक ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे सामने चोरोंडे येथील क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत अंतिम सामना अ 3 सोगांव संघ व मल्हार वॉरियर्स चोरोंडे संघामध्ये झाला. यावेळी अटीतटीच्या लढतीत ए 3 सोगाव संघाने बाजी मारत मापगाव पंचायत लीग 2024 च्या चषकावर आपली मोहोर उमटवली. या संघाला प्रथम क्रमांकाचे 50,000 रुपये पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले, तर मल्हार वॉरियर्स चोरोंडे या संघाला द्वितीय क्रमांक 25,000 रुपये पारितोषिक व चषक सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट सिक्सर किंग म्हणून ए 3 सोगाव संघाचा माहीद कुर आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अ 3 सोगाव संघाचा अजिंक्य राऊत तर स्पर्धेत सामनावीर म्हणून ए 3 सोगाव संघाचा अक्षय राऊत यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, माजी सदस्य विजय भगत, माजी ग्रामपंचायत सदस्या स्नेहा रुत, सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत, अशोक नाईक यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी प्रभाकर मोहिते, गितेश करळकर, अजित घरत, मजीद कुर, बंडू अधिकारी, राजेंद्र घरत, विश्वास थळे, मुदस्सर कुर, उत्तम राऊत, सुमेश थळे, तेजस काठे, उदय घरत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत समालोचन नदीम वाकनिस, यश मापगावकर यांनी केले, तसेच स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सानवी स्पोर्ट्स चोरोंडे व जय हनुमान क्रीडा मंडळ, चोरोंडे मंडळाचे कार्यकर्ते मयूर नाईक व सहकारी यांनी मेहनत घेतली.