राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा लांबणीवर
| मुंबई | वृत्तसंस्था |
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने मानवत-परभणी येथे दिनांक 5 नोव्हेंबर पासून होणारी किशोर, किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मराठा आंदोलनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आंदोलन दिवसेंदिवस अधिक अधिक उग्र स्वरूप घेत आहे. एकूणच मराठा आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन, परिस्थिती पूर्वपदावर आल्याची खातरजमा करून लवकरच पुढील तारखा जाहीर करण्यात येणार आहे. सर्व संघटना, खेळाडू, सामनाधिकारी व कार्यकर्ते यांना झालेल्या तसदी बद्दल महाराष्ट्र राज्य संघटनेकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. अशा प्रकारचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमाना प्रसिद्धीसाठी दिले आहे.