मराठ्यांचा राज ठाकरेंना घेराव

आरक्षणाबाबतच भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

| सोलापूर | प्रतिनिधी |

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे मराठवाडा दौर्‍यावर आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी सोलापुरात माध्यमांशी संवाद साधला. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्‍नावरदेखील भाष्य केलं. महाराष्ट्राममध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं मत ठाकरेंनी व्यक्त केलं. यावरुन मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलला घेराव घालून ठाकरेंनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे धाराशिव दौर्‍यावर आहेत. ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला. मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट मागितली होती. मराठा आरक्षणावर त्यांना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायची होती. पण राज ठाकरे यांनी भेट नाकराल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले. जोपर्यंत राज ठाकरे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती. त्यामुळे पुष्पक हॉटेल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संतप्त मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Exit mobile version