मराठबोली दिवाळी अंक स्पर्धेत कृषीवल दिवाळी अंक द्वितीय 

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मराठबोली, पुणे संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत सृजन (मुंबई) आणि अक्षरधारा (पुणे) या अंकांनी प्रथम, वारसा (नगर) आणि कृषीवल (अलिबाग) या अंकांनी द्वितीय तर, लोकप्रभा (बीड) आणि लोकसंकेत (नांदेड) या अंकांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. जनस्तंभ (लातूर), दर्यावदों (मुंबई), शुभम (पुणे), शब्द शंकरपाळी (मुंबई), लोकसेवक (पेण), स्नेहदा (मुंबई), आघाडी (मालवण) या अंकांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर झाली आहेत. मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालय येथे ३० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात हो पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत, असे संस्थेच्या रजनी धोंगडे यांनी कळविले आहे.

Exit mobile version