| खोपोली | वार्ताहर |
के.एम.सी. महाविद्यालय ‘मराठी भाषा व साहित्य मंडळ’ आणि अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र, लेखन कौशल्य कार्यशाळा, कवी संमेलन, मार्गदर्शनपर व्याख्याने, मुलाखत, निबंध व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केलेले होते. संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष, संजय पाटील, कार्यवाह किशोर पाटील, उपाध्यक्ष राजेश अभाणी, प्राचार्य डॉ. प्रताप पाटील यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
यावेळी लेखन कौशल्य कार्यशाळा, कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कोमसाप खोपोलीच्या अध्यक्षा उज्वला वामन दिघे कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. सर्व सभासदांनी व महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी यावेळी उत्स्फूर्तपणे या कविसंमेलनात सहभाग घेत आपल्या कविता सादर केल्या.
प्राचार्य, डॉ.प्रताप पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अशी बोलते माझी कविता या उपक्रमात उज्वला वामन दिघे, इतराज, नलिनी पाटील, रवींद्र घोडके सर, नरेंद्र मोरेश्वर हर्डीकर, प्रकाश राजोपाध्ये, सौ.जयश्री दयानंद पोळ, डॉ.सुभाष कटकदौंड, प्रा.प्रशांत माने, निशा हेमंत दळवी, अनिल कुमार रानडे संतोष वाघ, प्रा.एस.एस.चव्हाण, सूर्यकांत सरोदे, प्राचार्य डॉ.प्रताप पाटील, डॉ.अस्मी सावरेकर यांच्यासह नेहा राय, प्रथमेश धायगुडे, प्रसाद जाधव, संस्कृती तटकरे, अक्षय चव्हाण, केतन गवळी यांनी कविता सादर केल्या. मुक्त संवाद लेखकाशी या कार्यक्रमात लेखक व गझलकार डॉ.सुभाष कटकदौंड यांनी आपला साहित्य लेखनप्रवास उलगडला. डॉ.भाऊसाहेब नन्नवरे यांनी मुलाखतीतून संवाद साधला. विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या विषयावर घेतलेल्या निबंध स्पर्धेत 22 विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.
हा संपूर्ण उपक्रम प्राचार्य, डॉ. प्रताप पाटील यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा.मोहन बल्लाळ, डॉ.भाऊसाहेब नन्नवरे, प्रा.विठ्ठल जाधव, जिमखाना चेअरमन प्रा. जी.पी.मुळीक, ग्रंथपाल श्री.चेतन सोनावणे, डॉ.विनायक गांदल, डॉ.दीपक गायकवाड, डॉ.विलास मगर, प्रा.धनश्री पवार, प्रा.प्रमिला भिलारे यांनी विशेष योगदान दिले. संस्कृती तटकरे, शिवानी आडे, स्नेहा गुप्ता, रूपाली वाघमारे, ऋतुजा सुर्वे, स्वप्नाली अगिवले, रोशनी पवार, श्लोका पाटील, रोशनी सुतक, निकिता भदे, प्रज्ञा गायकवाड, मनजीता खंडाळीकर, गौरी वाणी, सृष्टी इंगोले, संतोष वाघमारे, ऋतिक गवळे, प्रथमेश कमाणे, ज्ञानेश्वर कोळंबे, अफताब खोत, प्रसाद जाधव, प्रथमेश धायगुडे, निलेश काटकर, मुकेश, प्रणव सुतार यांनी उपक्रमात सहभाग घेत सर्व उपक्रम यशस्वी केले.