महापारेषण कंपनी सांघिक कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

| मुंबई । प्रतिनिधी ।
महापारेषण कंपनी सांघिक कार्यालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मायबोली अर्थात बोलीभाषा ही केवळ संप्रेषणाची, संवादाची भौतिक प्रगतीचे साधन नसून त्यापलीकडेही तिला एक सामाजिक, सांस्कृतिक भूमिका असते. मराठी भाषेचा वापर शासकीय कार्यालयात जास्तीत-जास्त करावा. तसेच दैनंदिन जीवनातही मराठीचा वापराचे महत्व सांगितले. सकाळच्या सत्रात मराठी भाषा संवर्धन महत्त्व या संदर्भात प्रसिध्द लेखिका, निर्माती, नाट्य व सिनेकलाकार श्रीमती मुग्धा गोडबोले यांची मुलाखत सुगत गमरे व नाट्यकलाकार मयुरेश साने यांनी घेतली. कवितेचे सादरीकरण मधुराणी गोखले, रवि करमरकर यांनी केले.

दुपारच्या सत्रात मराठी भाषेचे सरकारी कामकाजातील महत्त्व, मराठी बोलीभाषा व साहित्य, मराठी भाषा दिन गरज आणि महत्त्व, मराठी भाषेची चळवळ व आव्हाने या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये आसावरी तुलसी यांनी प्रथम, पारस सवाई व्दितीय तर तृतीय क्रमांकाचे गौतम कांबळे मानकरी ठरले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून किशोर महाबोले, विजय टाकळे, मयुरेश साने यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत पाटील, नितीन कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश आंबेकर यांनी केले तर आभार भरत पाटील यांनी मानले.

Exit mobile version