वसंतराव नाईक महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ.एम.ए. नगरबावडी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुरुड शाखा अध्यक्ष संजय गुंजाळ, युवाशक्ती जिल्हा प्रमुख सिद्धेश लखमदे, प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रीशैल भैरगुंडे, प्राध्यापक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कोणतीही भाषा ही त्या-त्या समाजाची रक्तवाहिनीच असते, सांस्कृतिक सामाजिक व्यवहारातून भाषा व्यापक बनते. महाराष्ट्र हे राज्य सर्वार्थाने वैविध्य असणारे राज्य आहे. इथल्या प्रथा, रुढी, परंपरा, धार्मिक विधी, लोकजीवन वेगवेगळ्या जाती-जमातीचे छोटे समुह तसेच प्रत्येक प्रदेशाचे म्हणून असलेली एखादी स्वतंत्र ओळख सुद्धा भाषेतून प्रकट होताना दिसते. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन करावयाचे असेल तर बोलीचे संवर्धन आधी करावे लागेल. असे प्रा. डॉ. श्रीशैल भैरगुंडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले, तर संजय गुंजाळ व सिद्धेश लखमदे यांनी स्वरचित काव्य रचना सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. सुत्रसंचालन करिष्मा पाटील यांनी केले तर सेजल खोत यांनी आभार मानले.

Exit mobile version