डम्पिंग ग्राऊंडविरोधात नगरपंचायतीवर मोर्चा

राणेची वाडी, आंबेळीतील ग्रामस्थ आक्रमक
| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील आंबेळी येथे होत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडविरोधात राणेची वाडी व आंबेळी ग्रामस्थांनी शुक्रवारी तळा नगरपंचायतीवर मोर्चा काढला. तळा पोस्ट ऑफिस ते नगरपंचायत कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला.

आंबेळी येथे होत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडची जागा ही शासनाने आरक्षित गावठाण म्हणून राखीव ठेवली होती. त्या काळामध्ये प्लेगची साथ आल्यामुळे तेथे असलेली वस्ती स्थलांतरित झाली. त्या काळातील वस्तीचे बांधकाम आजही त्या ठिकाणी आहे. मात्र, शासनाने ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता सदर गावठाण जागेचा नगरपंचायतीच्या नावाने घनकचरा व्यवस्थापनासाठी सातबारा बनविण्यात आला आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. तसेच पुढे जाऊन लोकसंख्या वाढली तर पुढच्या पिढीसाठी जागा उरली नसल्याने सदर जागा गावठाण म्हणून राखीव राहावी, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी नगरसेवक भास्कर गोळे, नगरसेविका माधुरी घोलप तसेच राणेची वाडी, आंबेळी, बौद्धवाडी व आदिवासीवाडी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version