पाल्हे कबड्डी स्पर्धेत मरीदेवी धेरंडची बाजी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

श्री वनदेव क्रीडा मंडळ व जय भवानी मित्र मंडळे पाल्हे यांच्यावतीने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन मंगळवार दि.12 रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त करण्यात आले होते.

या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. या वर्षातील कबड्डी स्पर्धेच्या हंगामाचा प्रारंभ झाल्यामुळे क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत मरीदेवी धेरंड जय विरुद्ध श्री गणेश दिवलांग या संघात झाली. या लढतीत मरीदेवी धेरंड हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. या संघास रोख रक्कम 21 हजार रु. व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांक श्री गणेश दिवलांग या संघास रोख रक्कम 15 हजार रु व आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकांचा मानकरी नूतन हनुमान ढवर, तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी पाडबादेवी रायवाडी या दोन्ही संघास प्रत्येकी 10 हजार रु. व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ऋतिक पाटील (धेरंड), उत्कृष्ट चढाई समाधान मोरे(रायवाडी), तर उत्कृष्ट पक्कड श्रेयस पाटील (ढवर), पब्लिक हिरो प्रतिक धुमाळ (दिवलांग) या खेळाडूंना मंडळाच्यावतीने आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version