| पनवेल | प्रतिनिधी |
दसऱ्याला किरकोळ बाजारात झेंडूला किलोला 120 ते 160 रुपयांचा भाव होता; पण सध्याच्या दिवाळी सणामध्ये 100 ते 120 रुपये किलो आहे. फुलांच्या भावातील घसरण 20 ते 25 टक्के असली तरी सणासुदीला भावात घसरण झाल्याने विक्रेते हवालदिल झाले आहेत.
दसऱ्याच्या दिवसांमध्ये पहिल्या बहरातील फुलांचे उत्पादन बाजारात येते. आता शेतातील फुलांचे उत्पादन शेवटच्या टप्प्यात असल्याने दर्जेदार फुले बाजारात येत नसल्याचे व्यापारी सुनील वायकर यांनी सांगितले. शिवाय, फुलांच्या आकारमानानुसार बाजारात कमी-जास्त प्रमाणात भाव आकारला जात आहे. त्यामुळे दसरा सणात घाऊक बाजारात 100 ते 120 रुपये किलोने विकली जाणारी झेंडूची फुले दिवाळी सणात 70 ते 100 रुपये भावाने फुले विकली जात आहेत; मात्र बाजारात दर्जेदार फुलांचा पुरवठा होत असताना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. किरकोळ बाजारात गावाकडून काही शेतकरी फुले विक्रीसाठी टेम्पोत घेऊन आल्याने झेंडूच्या फुलांना आकारमानानुसार 60 ते 80 रुपये प्रतिकिलोने होत आहे. दसऱ्याला 200 ते 220 रुपये असणारी शेवंतीची फुले 120 ते 150 रुपये किलो भावाने विकली जात आहेत.







