। इंग्लंड । वृत्तसंस्था ।
इंग्लंड संघ सध्या श्रीलंकाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका सुरू असतानाच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज मार्क वूडला यंदाच्या उर्वरित वर्षात क्रिकेट खेळता येणार नाही. मार्क वूड सध्या कोपराच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. खरंतर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे त्याला दुसर्या आणि तिसर्या सामन्यात खेळता आले नव्हते. यानंतर त्याने त्याच्या जॉइंट्समध्ये काहीशा वेदना होत असल्याने रुटीन स्कॅन केले. यामध्ये त्याच्या कोपराची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आहे.
मार्क वूडने एका पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या आधीच्या त्रासासाठी मी रुटीन चेकअप करताना काय विचार केला होता, पण जेव्हा मला कळाले की माझ्या उजव्या कोपराला बोन स्ट्रेबस आहे, तेव्हा मी चकीत झालो. श्रीलंकेविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत मला मांडीची छोटी दुखापत झाली. त्यावेळी मला आणि मेडिकल टीमला वाटले की माझ्या कोपराचीही तपासणी करावी, ज्याचा मला थोडा त्रास होत होता. यानंतर त्याने असेही म्हटले की, तो अनेक दुखापतींचा सामना केल्यानंतर खेळत आहे. तसेच त्याच्या फिटनेसवर खूप काम केले आहे. यानंतरही असे काही होणे त्रासदायक असते.