| पनवेल | वार्ताहर |
विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पती गिरीश बलर आणि सासू सुमन यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पूनम सिंग यांचे लग्न एप्रिल 2025 मध्ये गिरीश बलर यांच्याशी चंद्रपूर येथे झाले त खारघर सेक्टर 35 जी येथे राहण्यासाठी आले, मात्र त्यांच्यात भांडणे होत होती. बाहेरून पैसे आणण्यासाठी तिच्या मागे तगादा लावत होते आणि तिला मानसिक त्रास देत होते. त्यामुळे तीने लोखंडी हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .






