न्हावे येथील विवाहित महिला बेपत्ता

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यात चणेरा विभातील न्हावे येथील वेदिका चंद्रकांत धोदे (33) या दि. 6 जुलै रोजी सकाळी पाचच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या आहेत. याबाबत त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता त्यांचा तपास लागला नाही. याबाबत पती चंद्रकांत नाग्या धोदे (37) यांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सडपातळ बांधा, सावळा रंग, काळे केस, साधारण 152 सेमी उंची, अंगावर नेसलेली पिवळ्या रंगाची त्यावर हिरव्या रंगाची किनार असलेली साडी, पायात चप्पल असे त्यांचे वर्णन आहे. रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगल टेमकर पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version