| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील धामणे येथील 24 वर्षीय विवाहित महिला आपल्या सात महिन्यांच्या मुलासह घरातून बाहेर पडून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणे येथील रहिवासी प्रशांत शांताराम चिकणे (28) यांनी याबाबत महाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्यांची पत्नी प्रिया चिकणे (24) या दि. 30 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता आपल्या सात महिन्यांच्या मुलगा प्रिन्स याला सोबत घेऊन बिरवाडी येथे आईकडे जात आहे, असे सासू शीतल चिकणे यांना सांगून घरातून निघून गेल्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नसून त्यांचा कोणताही संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. बेपत्ता प्रिया चिकणे यांचा रंग सावळा, उंची सुमारे 5 फूट, शरीरयष्टी मध्यम असून त्यांनी जांभळ्या रंगाचा टॉप, निळी जीन्स परिधान केली होती. त्यांच्या डाव्या हातावर झीरीहरपीं असे गोंदलेले असून गळ्यात मंगळसूत्र आणि पायात काळ्या-चॉकलेटी रंगाच्या चप्पला होत्या. तर सात महिन्यांचा प्रिन्स याने गुलाबी रंगाचा टी-शर्ट, काळी हाफ पॅन्ट परिधान केली असून दोन्ही हातात काळ्या-पांढऱ्या रंगाचे पाटले आहेत. या प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. संबंधित महिला व बालकाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ महाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धामणे येथून विवाहित महिला बेपत्ता
