| नेरळ | वार्ताहर |
रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब यांचा उपक्रम असलेल्या हुतात्मा स्मारक समितीकडून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. या समितीकडून हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा बलिदान दिन 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो. सिद्धगड बलिदान दिनी आयोजित अभिवादन सभेत सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला हुतात्मा गौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी गिर्यारोहक संतोष दगडे यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. कार्यक्रमात भारतीय थळ सेनेतील निवृत्त जवान कुमार जाधव आणि निवृत्ती निलधे पाटील यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असून माजी आ. सुरेश लाड, कर्जतचे प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, मंगेश म्हसकर आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे हे उपस्थित होणार आहेत.







