हुतात्मा गौरव पुरस्कार जाहीर

| नेरळ । वार्ताहर ।
नेरळ येथील हुतात्मा स्मारक समिती यांच्या माध्यमातून दिले जाणारे हुतात्मा गौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट यांना देण्यात येणार आहे. दोन जानेवारी रोजी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या सिद्धगड बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण केले जाते.

रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब यांचा उपक्रम असलेल्या हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने नेरळ येथील हुतात्मा चौकात हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा स्मृतिदिन सिद्धगड बलिदान म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभा आयोजित केली जाते.हुतात्मा चौक येथे दोन जानेवारी रोजी सायंकाळी होणार्‍या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या दोन व्यक्ती किंवा संस्था यांचा सन्मान हुतात्मा गौरव पुरस्कार देवून केला जातो.या सोहळ्यात हुतात्मा गौरव पुरसकाराचे वितरण होणार असून सुरुवातीला नेरळ मधील हाजी लियाकत इंग्लिश मिडीयम स्कूल चे विद्यार्थी सिध्दगड बलिदानाचा रणसंग्राम हे नाटक सादर करणार आहेत.

Exit mobile version