खोपोलीत हुतात्मादिन साजरा

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली शहरातील कै. रामकृष्ण हरी धोटे या लायन्स क्लबच्या सभागृहात खालापूर व खोपोली शहरातील नाभिक समाज एकत्र येत वीर भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांचा हुतात्मादिन साजरा करण्यात आला. तसेच, खालापूर तालुका नाभिक तरुण महासंघाच्या माध्यमातून मंगळवार दि.2 रोजी वीर भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नितीन सावंत, दत्तात्रय मसुरकर, एकनाथ पिंगळे, उमेश गावंड, पंढरीनाथ राऊत, उर्मिला देवकर, सचिन मते, स्वप्निल सुर्वे, सुरज वाघेरे, दिग्विजय करपे, भारती लोते, संतोष देशमुख, विलास चालके, दिलीप पुरी, रविंद्र देवकर, प्रकाश जळगावकर, जयेश मोरे, मंगेश देवकर, दुर्गेश देवकर, सागर मोहिते, अमित देवकर, नितीन साळुंखे, दत्तात्रय आडाव, मनिष साळुंखे, कैलास पंडीत, संदीप राऊत, प्रफुल देवकर, सुनील खराडे, किरण पांडव आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने नागरिक महिला वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version