| उरण | प्रतिनिधी |
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने महाविद्यालयात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. 30 जानेवारी हा भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन असून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून सबंध देशात पाळला जातो. या दिवशी देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिवीरांना अभिवादन केले जाते. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात महात्मा गांधी स्मृतिदिन व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांनी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी त्यांनी गांधीजींचे अहिंसा हे तत्व जगात प्रभावशाली ठरले, असे प्रतिपादन केले. त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले, असे सांगितले. इतिहास विभाग प्रमुख डॉ.ए.जी.लोणे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले. यावेळी आय, क्यु,ए., सी समन्वयक डॉ. ए.आर.चव्हाण, ज्येष्ठ प्रा.व्हि. एस. इंदुलकर, डॉ.एच. के.जगताप, डॉ. ए.के गायकवाड, डॉ. अनुपमा कांबळे, प्रा. आर.टी. ठावरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी गांधी संस्कार परीक्षेच्या माध्यमातून गांधीजींच्या जीवन विचारांचे चिंतन केले.







