पोलिसांतर्फे पनवेलमध्ये मसाला दूध

| पनवेल | प्रतिनिधी |
दारू पियुन नका नाश करू शरीराचा असा संदेश देत कळंबोलीत दारू नको दूध पियु या.असा संदेश देत पनवेल महानगर पालिकेचे माजी नगरसेवक गोपाळ भगत यांच्या वतीने दिनांक 31डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी मोफत मसाला दूध वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन पनवेल नगरपालिकेचे माजी नागराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी प्रमुख पाहुणे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, नारायणशेठ घरत, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक रवींद्र भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

हे मसाला दूध वाटप कार्यक्रम गेली 9 वर्षे सुरु असून याचा लाभ कळंबोलीतील नागरिकांनी घेतला. 31 डिसेंबर असला की सगळीकडे लहान थोर मित्रमंडळ एकत्र येऊन सगळीकडे पार्ट्या आयोजित करतात. हॉटेलमध्ये तुडुंब गर्दी असते. या दिवशी तरुणाई मध्यरात्री आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडत असतात तर काहीजण 12 वाजेपर्यंत मद्यपान करण्यात व्यस्त असतात व मद्यपान केल्यानंतर असुरी शक्ती येऊन वेगाने वाहने चालवणे, मस्ती करणे, मारामारी, धिंगाणा करणे व वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे अशा प्रकारचे कृत्य करतात याची जाणीव ठेवूनच कळंबोली शहरातील पोलिस निवारा चौकात नगरसेवक गोपाळ भगत यांच्या वतीने 31 डिसेंबर रोजी रात्री मोफत मसाला दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला माझ्या तीस वर्षाच्या सेवेत असा 31डिसेंबर चा दूध वाटपाचा स्तुत्य कार्यक्रम प्रथमच पाहत आहे. तसेच द दुधाचा त्याच बरोबर द दानवत्वाचा पहायला मिळाला. असे सांगून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version