मशाल मोहत्सवाने शिवरायांचा प्रताप गड उजळला

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा व इतिहासाच्या स्मृती जागवणारा किल्ले प्रतापगड शनिवारी मशाल महोत्सवाने उजळून निघाला, यावर्षी कोरोनावे निर्बंध गेल्या वर्षीच्या तुलनेत शिथील झाल्याने भाविकांनी मनोभावे दर्शन घेत छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला उजाळा दिला.

किल्ले प्रतापगडावर भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला यावर्षी 362 वर्षे पूर्ण झाली. गडावरील संपूर्ण नवरात्र उत्सवाचे आयोजन श्री. छ. राजमाता कल्पनाराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. नवरात्रात नऊ दिवस सकाळ संध्याकाळ देवीची पूजा तसेच गोंधळ होत असतो. 9 दिवस पुराणांचे पाठ केले जातात. चौथ्या माळेदिवशी रात्री मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार शनिवारी हा मशाल महोत्सव पार पडला. भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यान किल्ले प्रतापगड शनिवारी रात्री मशाल महोत्सवाने उजळून निघाला. रात्रीच्या गडद काळोखातील गडाचे हे नगनरम्य दृश्य सार्‍यांनीच डोळ्यात साठवून ठेवले.
भाविकांनी गर्दी केली होती. गतवर्षी येथील चंद्रकांत उतेकर, विजय कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे विना हवालदार, आनंद उतेकर, संतोष भाविक हा सोहळा पार पडला होता. जाधव, विलास मोरे, ओमकार या मशाल महोत्सवाचे आयोजन देशपांडे व ग्रामस्थांनी केले.

Exit mobile version