मजगावच्या श्री शिवभक्त मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
| मुरूड शहर | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील मजगाव येथील श्री शिवभक्त मित्र मंडळ मजगाव यांच्यावतीने ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन बिरवाडी किल्ल्यावर करून स्थानिकांना अनोख्या पहाटेचे दर्शन घडविले.
रोहा तालुक्यातील चणेरा बिरवाडी येथील पुरातन किल्ल्यात शिवभक्त मंडळाच्या सदस्यांनी मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली. तसेच त्यांनी प्रथम गडाची स्वच्छता करुन गडपूजन कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर भव्य मशाल यात्रा किल्ले बिरवाडी ते मजगाव या मार्गावर काढण्यात आली. या कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थांसह मंडळाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सदस्य व विशेष म्हणजे शिवकन्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.