“पाच वर्षांखालील मुलांसाठी मास्कची शिफारस नाही, मात्र… “

। मुंबई । वृत्तसंस्था ।
आरोग्य मंत्रालयाने ‘मुले आणि किशोरवयीन (१८ वर्षाखालील) वयोगटासाठी कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सुधारित व्यापक मार्गदर्शक तत्त्वे’ मध्ये असेही म्हटले आहे की, पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्कची शिफारस केलेली नाही. मात्र हे देखील सांगितले गेले आहे की, आई-वडिलांच्या देखरेखीत ६ ते ११ वयोगटातील मुले सरिक्षित आणि योग्य पद्धतीने मास्कचा वापर करू शकतात.आरोग्य मंत्रालयाकडूनव सांगण्यात आले आहे की, १२ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील असलेलेल्यांनी मास्क वापरला पाहिजे. विशेषत: ओमायक्रॉन प्रकारांमुळे संसर्गाच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढ लक्षात घेऊन तज्ञांच्या गटाने मार्गदर्शक तत्त्वांचे सुधारणा केलेली आहे.

Exit mobile version