| माणगाव | प्रतिनिधी |
शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्था माणगाव तर्फे परळच्या के.ई.एम रुग्णालयाच्या सौजन्याने व विशेष सहकार्याने शिवजयंती निमित्त बुधवारी (दि.19) महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर माणगावातील सरलादेवी मंगल कार्यालय सभागृहात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे. तरी रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेतर्फे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी केले आहे. तसेच, शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना रक्तदान केल्याचे ओळखपत्र, प्रमाणपत्र व पदक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.