ओशिवरामध्ये इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईतल्या ओशिवरा परिसरातील रिया पॅलेस या इमारतीला दहाव्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीमध्ये तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशनम दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवरामधील रिया पॅलेस या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दहाव्या मजल्यावर दोन वृद्ध राहत होते. त्यांच्या घरामध्ये कामासाठी नोकर ठेवण्यात आला होता. या आगीमध्ये तिघांचा मृत्यू झाला. चंद्रप्रकाश सोनी (74), ममता सोनी (74 ) आणि त्यांचा नोकर पेलू बेटा ( 42) यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये आणखी काही जण अडकल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहेत. आगीमध्ये परिसरामध्ये धुराचे लोट परसरले आहेत. ओशिवरा पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे.

Exit mobile version