छत्तीसगडमध्ये भीषण स्फोट ! दुर्घटनेत 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील एका स्फोटकाच्या फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बेरलामधील पिरडा गावात हा स्फोट झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

सध्याच्या माहितीनुसार, सहाजण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी डोंबिवली येथे एका केमिकलच्या कंपनीत स्फोट झाला होता. त्यातच आता ही छत्तीसगडमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटावेळी अनेकजण परिसरात उपस्थित होते असे सांगितले जाते. स्फोटकांच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. युद्ध पातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत. स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. स्फोट इतका मोठा होता की किलोमीटरपर्यंत हादरा बसला होता. दरम्यान, आतापर्यंत एकाही मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली नाही.

Exit mobile version