। उत्तर प्रदेश । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अलीगंज भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पुरनिया चौकाजवळील एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागली. जीव वाचवण्यासाठी सात ते आठ विद्यार्थ्यांनी इमारतीवरून खाली उड्या मारल्या. मात्र, अजूनही सुमारे 20 ते 25 विद्यार्थी आत अडकल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या आगीत अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या मारून आपले प्राण वाचवले. सध्या युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मसह अग्निशामक दलाच्या 14 गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत. अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
लखनऊमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग

fire isolated over black background