| मुंबई | प्रतिनिधी |
घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या बर्गर शॉपला भीषण आग लागली. सुदैवानं दुकानातील कर्मचारी प्रसंगावधान राखून बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या श्रद्धानंद रोडवरील बर्गरच्या दुकानाला आज, बुधवारी (दि.30) भीषण आग लागली. बॉम्बे बर्गर नावाचं हे दुकान आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच हे बर्गरचं दुकान आहे. या दुकानातून सुरुवातीला धूर येऊ लागला. काही वेळानं आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. या घटनेनं गोंधळ काही काळ निर्माण झाला होता. दुकानातील कर्मचारी वेळीच बाहेर पडले. त्यामुळं जीवितहानी टळली. आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनी धावाधाव केली. अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने ही आग आजूबाजूच्या दुकानात पसरली नाही. या आगीत संपूर्ण दुकान खाक झाले आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील बर्गर शॉपला भीषण आग

fire isolated over black background