। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जेल फार्मासिटिकल या कंपनीला आग लागली आहे. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे दाट लोट पसरले आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.






