| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्र सरकारने सोमवारी खासदारांच्या वेतनात भरघोस वाढ जाहीर केली. आता खासदारांना एक लाखाऐवजी 1.24 लाख रुपये वेतन मिळणार आहे. वेतनासोबतच सरकारने खासदारांच्या निवृत्तीवेतन आणि भत्त्यांमध्येही वाढ केली आहे. खासदारांच्या दैनंदिन भत्त्यात 500 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता दैनंदिन भत्ता 2000 रुपयांवरून 2500 रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. ही नवीन वेतनवाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू केली जाणार आहे. एप्रिल 2023 पासूनच लागू होईल. या निर्णयापूर्वी खासदारांची पेन्शन 25 हजार रुपये होती, ती आता 31 हजार रुपये करण्यात आली आहे.