नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मुस्लिम महिलांची इंटरनेट बदनामी करणार्याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सुल्ली अॅपची निर्मिती करणार्या मास्टरमाइंडला अटक केली आहे. ओमकेश्वर ठाकुर असे अॅप तयार करणार्या आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी इंदुर येथून अटक केली आहे. 25 वर्षीय आरोपी ओमकेश्वर ठाकुर याने इंदुरच्या आयपीएस अॅकॉडमीतून इउ- केले आहे. गेल्या वर्षी जुलै 2021 मध्ये त्याने सुल्ली अॅपची निर्मिती केली होती. या अॅपमध्ये मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करुन, त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू होते.