तळा तालुक्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ कार्यक्रम

। तळा । वार्ताहर ।

तालुक्यातील मौजे वाशी हवेली येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित कार्यक्रम राबविण्यात आले. वाशी हवेलीचे जगन्नाथ तांडेल हे आपल्या ग्रामपंचायतीमार्फत शासनाच्या विविध योजना व कार्यक्रम ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी राबवित असतात. त्याअनुषंगाने माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमात वाशी हवेली ग्रामपंचायत हद्दीतील गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली यांसह 18 वर्षावरील महिलांचे बीपी, शुगर, सीबीसी, थायरॉईड, एलएफटी, आर एफ टी तपासणी करण्यात आली. तसेच किशोरवयीन मुलींची देखील आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन आणि औषधोपचार करण्यात आला. या कार्यक्रमाचा 282 महिलांनी लाभ घेतला. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच जगन्नाथ तांडेल, सी एच ओ ढेपे, आरोग्य सहाय्यक शिंदे, व्ही एम चव्हाण, आरोग्य सेविका खेडकर मॅडम, आरोग्य सेवक एस डी सकपाल, आरोग्य सेवक एल जे चव्हाण, डी.बी. मोरवेकर, वाहन चालक प्रतीक पाटील, गटप्रवर्तक शुभांगी कडवेकर व साई पी एस सी सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या.

Exit mobile version