सुरेश चव्हाण यांना मातृशोक

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील कोयना वसाहत खरवली फाटा येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांच्या मातोश्री कृष्णाबाई मारुतीराव चव्हाण यांचे रविवारी (दि.5) राहत्या घरी कोयना वसाहत खरवली फाटा येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात 3 मुले, 2 मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रियाविधी मंगळवारी (दि.14) तर उत्तरकार्य विधी गुरुवारी (दि.16) राहते घरी कोयना वसाहत खरवली फाटा येथे होणार आहे.

Exit mobile version